Share

आदर्श गाव पाटोद्यावर शिवसेनेचा भगवा फडकला

Published On: 

औरंगाबाद : आदर्श गाव पाटोद्यात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सत्कार केला.

आदर्श गाव पाटोद्यात ११ पैकी ११ शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत. यात कपिंद्र पेरे, पुष्पा सोमीनाथ पेरे ,सुनिता कृष्णा पेरे, बब्बाभाई कैलास पेरे, पुनम गाडेकर, मिरा जाधव, शामल थटवले ,लक्ष्मण मातकर, छाया पवार, जयश्री दिवेकर, मंदा खोकड यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, आपण आदर्श असलेल्या पाटोदा गावाची परंपरा कायम ठेवावी. समाजाच्या हिताचे, जनतेचे कार्य करण्यास प्राधान्य द्यावे.

दरम्यान, पूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पोटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. तब्बल 30 वर्षानंतर पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत. पाटोदा या गावात पेरे पाटील यांनी मोठे काम उभे केले आहे. ग्रामविकासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!