Share

शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनाच निवडून येणार- संजय राऊत

Published On: 

पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत सध्या पुण्यात असून त्यांनी यावेळी  भाजपवर निशाना साधत येणाऱ्या निवडणुकीत शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी शिवसैनिकांनी कार्याला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यावरून त्यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना सेनेचे तगडे आव्हानच त्यांनी दिले असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधान सभा निवडणुकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला होता. यावरूनच संजय राऊत यांनी आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही. त्यामुळे पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. शब्द फिरवणे हे तुम्हाला जमते आम्हाला नाही. असा पलटवार केला आहे.

यावेळी त्यांनी राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. असे म्हटले आहे. यावरून त्यांनी सेनेचे महाविकास आघाडी मधील महत्व अधोरेखित केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!