🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात शिवसेना सत्ता स्थापन करणार हे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याची चर्चा सध्या सुरू असून, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही तसे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मलिक म्हणाले, “पर्यायी सरकार देणं ही आमची जबाबदारी आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत सरकार स्थापन करावं, भाजपने साडेतीन वर्ष तर शिवसेनेने दीड वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यावं, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलें यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. हि बैठक नुकतीच संपली असून या बैठकीत सत्तेस्थापनेबाबत चर्चा झाली असल्याचं कळतं आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये उद्धव आणि शरद पवार यांची भेट झाली. आदित्य ठाकरे आणि अजित पवारही उपस्थित होते. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे. सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1193826915909455872?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1193826745398333440?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
