Share

शिवसेनेचा भाजपला धक्का; मुंबईमधील ‘या’ नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

Published On: 

मुंबई:- भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. आता भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता. त्यापाठोपाठ सेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला आहे. कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजपा मुंबई मनपा जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात आउटगोईंग सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!