उस्मानाबाद : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील गावांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची नितांत गरज असून केंद्र सरकारने ४५ वर्षावरील वयोगटासाठी लस पुरवठा करावा, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.
ओमराजे यांनी म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार सध्या ४५ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी पहिला व दुसरा डोस जिल्ह्यात ९,३१,७७४ नागरिकांना देणे बाकी आहे. औसा व निलंगा तालुक्यात २,६,८०२ तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक लाख १ हजार २ नागरिकांना देणे बाकी आहे, म्हणजेच लोकसभा मतदारसंघात १२ लाख ३९ हजार ५७८ लस देणे आवश्यक आहे.
परंतू आतापर्यंत मतदारसंघात २,२५,७१६ लस उपलब्ध झाली. आणखी १० लाख १३ हजार ८६२ लसींची गरज आहे. महाराष्ट्र शासन केंद्राकडे ४५ वर्षांवरील पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोस देण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात वारंवार मागणी करत आहे. परंतु केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जलद व मोठ्या प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध करावी.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणावरील ‘ती’ पोस्ट भोवली, दादासाहेब मुंडे काँग्रेसमधून निलंबित
- करणीच्या नावाखाली महिलेची सहा लाखांची फसवणूक, भोंदूबाबावर गुन्हा
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- ‘देशाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू’, संजय राऊतांची टीका
- आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

