औरंगाबाद: गेल्या २ महिन्यांपासून विलीनीकरण या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी लढा उभारला आहे. मात्र अजूनपर्यंत या लढ्याला यश आलेले नाही. राज्य शासन आपल्या निर्णयावर ठाम आहे तर कर्मचारी देखील जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही. असा आक्रमक पवित्रा अधिकांश कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे एसटीची चाके आहे त्याच ठिकाणी रुतलेली आहेत. मात्र आता शिवसेनेच्याच आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विलीनीकरणाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
७ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मरणाची परवानगी मागितली आहे. जर विलीनीकरण होणार नसेल तर शासनाने आम्हाला मरण्याची तरी परवानगी द्यावी असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. याआधी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता त्यांच्यानंतर भूम-परंडा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. एसटी संपावरुन राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. आता या पार्श्वभूमीवर खुद्द शिवसेनेचे आमदार विरोधी पक्षाकडून करण्यात येणारी मागणी करत असल्याने यावरून विरोधी पक्षांना आयते कोलीत मिळाले आहे. त्याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये सावंत हे नाराज असल्याचे देखील बोलले जात असल्याने त्यांच्या या पत्रातवरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांची तत्परता! ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले; पाहा व्हिडिओ
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती

