Share

शिवसेनेकडे 175 आमदारांचं संख्याबळ, लवकरच गौप्यस्फोट होईल – संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी तिढा निर्माण झाला आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर दावा करत असताना दिसत आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याचं चित्र आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे राजकारण गुंडांपेक्षा घाण आहे. भाजपने सत्तेसाठी प्रशासकीय यंत्रणांचा वापर केला साल्याचा आरोप राउत यांनी भाजपवर केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे हे सत्तास्थापनेच्या अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत असंही ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी चर्चा झाली तर मुख्यमंत्री पदाविषयी होईल.तसेच शिवसेनेकडं 175 आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांच्याविषयी बोलताना ते राज्याच्या राजकारणात परतणार नाहीत असं विधान केले आहे. तसेच सत्तेचे समीकरण जुळल्यास ते आम्ही माध्यमांसमोर मांडू असाही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेसोबत सतत स्थापनेविषयी सूचक विधान केले आहे. त्यांनी ‘आधीही विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. मग कोणी राज्यसभेचा सदस्य असेल, कुणी लोकसभेचा, असं विधान केले आहे. त्यामुळे राज्यसभेचे सदस्य असलेले शरद पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190867690702790656?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190873200223121408?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190877545148764160?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190877671867047936?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!