Share

ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये मदतीसाठी अब्दुल सत्तार यांचा मोर्चा

Published On: 

सिल्लोड : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, हेक्टरी 50 हजार रुपये मदत यासह अन्य मागण्यासाठी सिल्लोड येथे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

सिल्लोड तालुक्यात लाखो हेक्टरवरील पिकांची परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. सोयाबीन कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी ,हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात आला.

सिल्लोड च्या नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनी निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. मुंबईच्या बैठकीनंतर सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तर आज गटनेते निवडी पूर्वी सत्तार यांचा सिल्लोड शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांनी शेतकऱ्यांचा कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजेत, हेक्टरी 50 हजाराची मदत मिळालीच पाहिजे अशी मागणी केली. या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यास देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190157081464041472?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190160099211268097?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!