Share

शिवसेनेचा वाघ अनिल राठोड कोरोनाच्या विळख्यात

Published On: 

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. शहराचा मध्य भाग असलेल्या चितळे रोड, नेता सुभाष चौक परिसरातही कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. याच परिसरात राठोड यांचे संपर्क कार्यालय आहे.

राठोड यांना त्रास जाणवत असल्याने रविवारी त्यांनी घशातील स्त्राव तपासणीसाठी दिले होते. राठोड यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा व सून अशा चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आढळल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवसेनेला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

अहमदनगरमधील एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 817 वर पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 2 हजार 418 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 हजार 346 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अहमदनगरमध्ये आतापर्यंत 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सोमवारी (27 जुलै) सायंकाळी 6 वाजल्यापासून आज (28 जुलै) दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 54 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1346 इतकी झाली. दरम्यान, आज दिवसभरात 133 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 2418 झाली.

मराठा आरक्षण सुनावणीबाबत भाजपकडून विपर्यास – अशोक चव्हाण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!