Share

शिवसेनेला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

Published On: 

लातूर : लातूरचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेश माने यांचा कोरोनामुळे आज उपचारादरम्यान सोलापूर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेशकुमार माने यांना 22 जुलै रोजी उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान सोलापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी ते 48 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मराठा आरक्षण सुनावणीबाबत भाजपकडून विपर्यास – अशोक चव्हाण

दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री आणि अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा आणि सुनेचा कोरोना अहवाल अद्याप बाकी आहे. या सर्वांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राठोड आणि त्यांच्या पत्नीच्या संपर्कातील इतर लोकांचेही स्वॅब नमुने घेतले जात आहेत. त्याचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत. अहमदनगरमधील एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 817 वर पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 2 हजार 418 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजेत; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!