Share

मस्तवाल सत्ताधा-यांना लोकांनी झुकवलं:उद्धव ठाकरे

Published On: 

वेब टीम :मस्तवाल सत्ताधा-यांना लोकांनी झुकवलं आहे असं सागंत उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारल्याबद्दल लोकांचं अभिनंदन केलं. जीएसटीमध्ये बदल म्हणजे सरकार ताळ्यावर आल्याचं लक्षण आहे, असंच जागं राहून आवाज उठवल्यास सरकार झुकेल, असंही मत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात तातडीची पत्रकार परिषद घेवून व्यक्त केलं .

जीएसटी कमी करणं हा सरकारचा नाविलाज आहे. लोकांच्या संतापाची झळ सरकारला जाणवू लागली आहे. सोबतच जीसएटी कर मागे घेतला आहे, तर मग जो वसूल केला तो परत करणार का ? कमी करायचा होता तर मग इतका कर कशाला लावण्यात आला ? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले. सण कसे साजरे करायचा असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे, कारण लक्ष्मी केंद्राने ओरबाडून नेली आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी उद्धव ठाकरे जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीवरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली. सरकारने दिवाळीची भेट दिली असं चित्र उभं करण्यात आलं आहे. दिवाळीत त्रास देणार नाही ही मोदींची भेट असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेना नेत्यांनी तीन विषय मांडले होते, त्यातील दोन विषय मार्गी लावले असून त्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानत आहोत. अंगणावाडी सेविका आणि रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले हटवण्याचा विषय आम्ही माडंला होता. हे विषय मार्गी लावल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!