मुंबई : गेले काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. राजकीय घमासानातून अनेक वेळा वाद पराकोटीच्या तणावावर जाऊन हिंसेपर्यंत गेल्याच्या अनेक घटना आहेत. आता, राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे अशीच एक संतापजनक घटना समोर आणली आहे. कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड वरून झालेल्या वादातून एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यासह देशात अनेक वेळा अशा घटना घडलेल्या दिसून येतात. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धक्कदायक आणि दुःखद घटना. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली. माननीय उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवावा. या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. अस फडणवीस म्हणाले आहेत.
Extremely sad & shocking incident.
Retired Naval Officer got beaten up by goons because of just a whatsapp forward.
Pls stop this GundaRaj Hon Uddhav Thackeray ji.
We demand strong action and punishment to these goons. https://t.co/g4fQ5xfPYz pic.twitter.com/p1vdP2P0m8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2020
याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. त्यानंतर, भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत के कार्यालय की तोड़फोड़ करके अपनी मर्दानगी दिखाने वाले सत्ताधारी शिवसेना ने अब सत्ता के मद में एक बुजुर्ग भूतपूर्व नौसेना अधिकारी मदन शर्मा को मारपीट करते हुए उनकी आंख को जबरदस्त चोट पहुंचाई है। मुख्यमंत्री घरबैठे तानाशाही चला रहे है। pic.twitter.com/qF2NVcIN55
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
महत्वाच्या बातम्या
पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा,अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले
मराठा आरक्षण: सरकारने गांभीर्य दाखवले नाही तर रस्त्यावर उतरू ; शिवेंद्रराजेंचा इशारा
तर आम्ही प्रियांका गांधींचा बंगला पाडू- भाजप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

