Share

वडिलांचं नाही, लेकीचं ऐका… शीतल जगतापांची माहेरच्या मंडळीना साद !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपने विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्या विरोधात आमदार संग्राम जगताप यांना उमेदवार देत तगड आव्हान उभं केल आहे. अशात एकीकडे सुजय विखे यांच्या प्रचारात पिता राधाकृष्ण विखे हे हजर राहू शकत नाहीत तरदुसरीकडे संग्राम जगताप यांचा प्रचार त्यांचे सासरे आणि नगर जिल्याचे किंगमेकर शिवाजी कर्डिले करू शकत नसल्याने ही ‘कांटे की टक्कर’ अजूनच रंगतदार झाली आहे.

मात्र, अशात आता शिवाजी कर्डिले यांची कन्या आणि संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका शीतल जगताप या स्वतः संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी उतरल्या आहेत. आणि यात विशेष बाब म्हणजे त्यांनी प्रचाराची सुरवात थेट पिता शिवाजी कर्डिले यांच्या बालेकील्यातूनच केली आहे.

बुऱ्हाणनगरचे ग्रामदैवत तुळजाभवानी समोर नतमस्तक होऊन शितल जगताप यांनी गावातून प्रचार फेरीस प्रारंभ केला. गावातून काढलेल्या प्रचार फेरीत त्यांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला व ज्येष्ठांचे संवाद साधला. संग्राम यांच्या कार्याची आणि भविष्यातील विकासासाठी योजनांची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जेऊर गटातील शेंडी, कापूरवाडी, नागरदेवळे, पोखर्डी, पिंपळगाव माळवी, जेऊर गावात प्रचार दौरा केला. रात्री उशिरा पिंपळगाव उज्जैनी येथे या दौऱ्याचा शेवट झाला. गावागावात तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. जगताप यांनी जनावरांच्या छावण्यांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधत छावण्यांमधील सर्व सुविधा व पाण्याबाबत त्यांनी चौकशी केली. बुऱ्हाणनगर माहेर असलेल्या ग्रामस्थ महिलांनी त्यांची आस्थेने चौकशी केली आणि आपुलकीने संवाद साधला.

दरम्यान, काल अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज शेतकरी पती-पत्नीच्या हस्ते दाखल केला. जवळा (ता. पारनेर) येथील शेतकरी बबनराव रासकर व त्यांच्या पत्नी अंजना रासकर या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते जगताप यांनी अर्ज दाखल केला .

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जगताप यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आनंदऋषी महाराजांच्या समाधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. जुन्या बसस्थानक चौकातून त्यांची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोचणार आहे. या महारॅलीला नगरकरांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान, भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना असचं शक्तीप्रदर्शन केल होत. त्यामुळे नगरची लढाईत ‘हम भी किसी से कम नही’ हेच संग्राम जगताप यांनी दाखून दिल आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!