Share

काँग्रेस वेगळी झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जर वेगळं लढण्याचं ठरलं असेल तर आधीच सांगा, जेणे करुन आम्ही देखील तयारीला लागू…अशा शब्दात राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवारांनी स्वबळाचे नारे देणाऱ्या काँग्रेसला सूचना वजा इशारा दिलाय. काल शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात खलबतं झाली यावेळी पवारांनी कॉंग्रेस नेत्यांचा चांगलाच क्लास घेतल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे या बैठकीपासून नाना पटोलेंना दूर ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक वक्तव्यांनी महाविकास आघाडीला हादरे देणाऱ्या नाना पटोलेंना हायकमांडचा पाठिंबा आहे का अशी विचारणा देखील पवारांनी केल्याचं समजतंय. पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा तुमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. मुंबई काँग्रसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण यासंदर्भातले अधिकार दिलेत? दिले असतील तर तसंही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नसल्याचं पवार म्हणालेत.

या बैठकीनंतर आणि पवारांच्या विचारणेनंतर नाना पटोले काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. नाना पटोले आता आपली आक्रमकता कमी करून स्वबळाच्या भूमिकेवरून माघार घेतात का ? याकडे लश होते. मात्र आज देखील नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे,

‘महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम नक्की पाहायला मिळतील. आम्ही जी दिशा घेऊन काम करत आहोत, त्यावरुन महाराष्ट्रात काँग्रेस ही एक नंबरची पार्टी आहे हे तुम्हाला येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.’ असं नाना पटोले म्हणाले आहेत.

यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याविषयी निर्णय सोनिया, राहुल, प्रियंका गांधी घेतील. जर काँग्रेस वेगळी झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील’ असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!