नवी दिल्ली: कर्नाटकातील हिजाब बंदी विरुद्ध प्रकरणाला चांगलेच राजकीय वळण मिळाले आहे. कर्नाटकात काही दिवसांपूर्वी मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत आणि महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घातली होती. त्याविरोधात न्यायालयात विद्यार्थिनींनी दाद मागितली आहे. तत्पूर्वी या संदर्भात एक व्हिडिओ सध्या जाम व्हायरल झाला असून त्यात मुस्कान नावाच्या एका विद्यार्थिनीसमोर भगवे शेले घेऊन सुमारे ५० – ६० विद्यार्थी ‘जय श्री राम’ चे नारे देत आहेत, त्यावरच तिने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले आहे. आता यावरच AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या मुलीचा व्हिडिओ पोस्ट करत ओवैसी यांनी मुस्कानचे कौतुक करत म्हटले आहे की ,”तिने आपल्या हिमतीने या कमजोर मुलांना प्रत्युत्तर दिले आहे. तिच्या हिमतीला मी सलाम करतो. तसेच तिच्या आई-वडिलांनाही माझा सलाम. या मुलीने एक मिसाल बनवली आहे. जे कार्य त्या मुलीने केले आहे, ते प्रचंड हिमतीचे काम असून तिने एक मिसाल सिद्ध केली आहे.”
#AllahuAkbar pic.twitter.com/p2Eafbr9NK
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 8, 2022
तसेच कर्नाटकातील तरुण मुस्लिम महिला विद्यार्थिनींनी हिंदुत्ववादी जमावाला चिथावणी देऊन मोठे धैर्य दाखवले आहे. त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांचे वर्तन अनुकरणीय आहे. आणि या सर्व प्रकरणात राज्य सरकारचा सहभाग असल्याचा आरोपही ओवैसी यांनी केला आहे.
दरम्यान मुस्कानने नंतर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ती कॉलेजमध्ये असाइनमेंटसाठी आली असता तिला कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तसेच तिला बुरखा काढूनच आत येण्याचे म्हटले गेले. यावर काही हिंदू विद्यार्थ्यांनी येथे ‘जय श्री राम’ चे नारे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रत्युत्तरात मी ‘अल्ला हू अकबर’ अशी घोषणा दिली असल्याचे तिने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “केंद्राने ट्रेन पाठवल्या तरी, त्या रिकाम्या पाठवणे तुमची जबाबदारी होती”, चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
- १९ वर्षांखालील ४ अफगाणी क्रिकेट पटूंचा मोठा निर्णय…
- रामानुजाचार्यांनी संपूर्ण देशाला समतेचा संदेश दिला असून हा संदेश युगानुयुगे राहील- अमित शहा
- कर्नाटकातील हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही
- ‘या’ राज्यात सर्व कॉँग्रेस आमदारांचे बंड; घेतला मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

