Share

चला पतंग उडवूया : अनंतराव पवार महाविद्यालयाकडून शारदा पतंग महोत्सवाचे आयोजन

Published On: 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अनंतराव पवार महाविद्यालयाच्या वतीने ‘शारदा पतंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव रविवार (ता. २ ) रोजी अनंतराव पवार महाविद्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत होणार आहे. तसेच या कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

शारदा पतंग महोत्सवासाठी पुण्यातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आमंत्रित केले आहे. या महोत्सवात बिनमांज्याचे पतंग असतील. तसेच ड्रोन पतंग शालेय विद्यार्थ्यांसाठी पतंगबाजी, अस्सल गावरान खाद्यमहोत्सव, आकर्षक कलाकुसरीच्या वस्तू व दागिन्यांचे स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम अशी अनेक वैशिष्टये या महोत्सवामध्ये असणार आहेत. हा महोत्सव सर्वांना सहभागासाठी खुला आहे.

या निमित्ताने आयोजित स्पर्धेत विद्यार्थांचा व खुला असे दोन गट तयार केले आहेत. दोन विद्यार्थ्यांचा एक संघ करून स्पर्धेत सहभाग घेता येईल. तसेच विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे असणार आहेत. या निमित्ताने ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यामध्ये समन्वय व्हावा यासाठी हा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

निळयाभोर आकाशाखाली खुल्या मैदानात एकमेकांच्या साथीने पतंगबाजीचा आनंद लुटणे ही खरे तर आपली संस्कृती आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण संपूर्ण हंगामामध्ये ही साजरी करत असू ! परंतू आजची पिढी या संस्कृतीपासून अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागातील तरूण मुले आणि शालेय विद्यार्थीसुध्दा पबजी, क्लॅश ऑफ क्लोन, कैंडी क्रश सारख्या गेम्सच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे ही लुप्त होत चाललेली सांस्कृतिक परंपरा पुनरूज्जीवित करणे हे पतंग महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहे.

अशी असेल पतंग महोत्सवाच्या स्पर्धेची नियमावली

– खुल्या गटामध्ये महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी ही सहभागी होऊ शकतात

– कागदी/कापडी पतंगास मान्यताअसून प्लॉस्टिक पतंगास मनाई

– चिनी मांजा इतर धोकादायक साधनांच्या वापरास सक्त मनाई

– पतंगावर आक्षेपाई सांकेतिक चिन्ह, राष्ट्रीय ध्वज, राजकीय पक्षांची चिन्हे, राष्ट्रीय पुरूषांचे फोटो पतंगावर लावण्यास सक्त मनाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!