Share

शरद पवार घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर होणार चर्चा 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील लोकसभा निवडणुका आटोपल्या नंतर राज्यातील नेते दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करू लागले आहेत. तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी परिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

यंदा राज्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई जाणवत आहे. जनावर चारा आणि पाण्याविना मृत्युमुखी पडत आहेत. त्यावर राज्य सरकार कडून लवकरात लवकर कोणती उपाय योजना केली जाणार आहे याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा सुरू केला होता. त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळ निवारणाच्या कामाबाबत पवारांजवळ त्यांचे प्रश्न मांडले. तेच प्रश्न घेऊन शरद पवार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!