टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून दुष्काळाची माहिती घेत असल्याची बातमी आपण वाचली. फोनवरून कोणीही माहिती घेवू शकते, मात्र सरकारने राज्यभरात फिरून परिस्थिती समजून घ्यायला हवी, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पवार माध्यमांशी बोलत होते.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत, मात्र काही जण राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत, दुष्काळा संदर्भात सरकारने राबवलेल्या कामांची यादी आपण कोणालाही द्यायला तयार आहोत, जाणताराजा आणि त्यांच्या पंटर लोकांनी चर्चेला यावं, असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
पाटील यांच्याबद्दल विचारल असता पवार म्हणाले की, गावांमध्ये पिण्याचे पाणी, चारा छावण्यासाठी अनेक नियम लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत बसून आव्हान देण्यापेक्षा राज्यातील दुष्काळी परिस्थतीची पाहणी करावी, तेव्हाचं खरी परिस्थिती कळेल, असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. दरम्यान आपण छोट्या लोकांच्या आव्हानाकडे लक्ष देत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
