टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शरद सोनवणे शिवबंधन बाधून सेनेत दाखल झाले आहे. सोनवणे यांच्यासह त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे.
कोण आहेत शरद सोनवणे ?
शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने शरद सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि ते जिंकूनही आले होते.
दरम्यान,सोनावणे शिवसेनेत येण्याआधी ‘मोतीश्री’वर त्यांना विरोध करण्यासाठी जुन्नरच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके मोताश्रीवर गेल्या होत्या. शरद सोनावणे यांना पक्षात घेण्याआधी शिवसैनिकांना विश्वासात घेतलं जाईल, असं आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशाताईंना दिलं होतं. आशाताई यांनी याआधी 2014 साली जुन्नर विधानसभा निवडणूक लढवली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

