टीम महाराष्ट्र देशा : उझबेकिस्तानमध्ये जवळपास ३९ भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या लोकांनी आपल्या नियोजित दौऱ्यानुसार या महाराष्ट्रीयन नागरिकांनी उझबेकिस्तान गाठले होते. मात्र, त्यांचा परतीचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. त्यामध्ये बहुतांश डॉक्टरांचा समावेश आहे.या लोकांसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहले आहे.
जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्याने आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विदेशातील अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी १० मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत.
या दौऱ्यानुसार १७ मार्च रोजी त्यांचे रिटर्न तिकीट होते. मात्र, अचानकपणे त्यांना रिटर्न्स फ्लाईट उपलब्ध नसून आपण भारतीय परराष्ट्र खात्याशी संपर्क साधा, असे सांगण्यात आले आहे. उझबेकिस्तान येथे अडकलेल्या या ३९ मराठी जनांसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पत्र लिहून या नागरिकांची देशवापसी करण्याची विनंती केली आहे.
तसेच, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनीही यासंदर्भात परराष्ट्र खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, उझबेकिस्तानमध्ये अडकलेल्या ३९ नागरिकांमध्ये सांगली जिल्ह्यातील १३, कोल्हापूर १, सोलापूर १३, नाशिक १, पुणे ११ अशी संख्या आहे. त्यामध्ये बहुतांश लोकं हे डॉक्टर्सं आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

