बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता २१ ऑगस्ट २०२० पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दूध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली असून या दोन्ही दिवशी कडक संचारबंदी (कर्फ्यु) लागू राहणार आहे. असे आदेश यापूर्वी निर्गमीत करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र शनिवार व रविवार उघडे राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी शनिवार व रविवारसह सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत महा ई सेवा व सीएससी केंद्र सुरू राहणार आहेत, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
दरम्यान, राज्यात आज ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९९ हजार ९६७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ७१४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६८ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २७८ मृत्यू हे मुंबई मनपा-५४, ठाणे-४, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-१०,कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-१६, वसई-विरार मनपा-४, पालघर-२,रायगड-१०, पनवेल मनपा-४, नाशिक-१, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे- १, जळगाव-९, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-८, पुणे मनपा-४९, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर-५, सोलापूर मनपा-४, सातारा-३, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, हिंगोली-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-३, बीड-२, नांदेड-३, नांदेड मनपा-१, यवतमाळ-१,नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.
विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई करा, हसन मुश्रीफांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

