मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्वाची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’वर ही भेट होणार आहे. राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे या भेटीत या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. यामध्ये राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले १४४ उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या.
दरम्यान, आता शरद पवार आणि मुख्यमंत्र्याच्या या भेटीवर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. या भेटीमध्ये नेमक्या काय चर्चा होतात? आणि महाविकास आघाडीची राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रश्नासह आघाडीतील नेत्यांवर धाडसत्र या मुद्द्यांवर नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तब्बल नऊवर्ष लहान असलेल्या ‘टप्पू’ला बबिता करतेय डेट
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

