मुंबई : मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज (ता. ११ ) त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मध्यप्रदेशात भाजपचे ऑपरेशन लोटस सक्रीय झाले असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता शिंदे यांच्या या भाजप प्रवेशाने हे ऑपरेशन लोटस चे उदाहरण समोर आले आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशातील राजकीय भुकंपानंतर महाराष्ट्रातही आता गुढीपाडव्याला महाविकास आघाडीचे सरकार पाडून, आमचे म्हणजे भाजपचे सरकार आणू, असे दावे भाजप नेते करीत आहेत. भाजप नेत्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार बुधवारी दुपारी विधीमंडळात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार घेतली. तेव्हा, मध्यप्रदेशातील पाडापाडीचे राजकारण, त्याची कारणे, परिणाम आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या शक्यतांवर पवार यांनी आपली भूमिका मांडली.’शिमगा झाला तरी महाराष्ट्रातले सरकार पाडायचे म्हणतात? अशा शब्दांत पवार यांनी भाजप नेत्यांना डिवचले. शिमगा संपला ना? असे विचारत भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले. तसेच मध्यप्रदेशात जे घडले तसे महाराष्ट्रात किंचितही काही घडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवार पुढे म्हणाले, ‘येस बँक आणि अशा प्रकारच्या घटना रोखण्यात केद्र सरकारचे अर्थमंत्रालय आणि विभाग कमी पडला आहे. मात्र, याबाबत लोक केंद्र सरकारला जाब विचारतील. यावेळी त्यांना तुम्ही महाराष्ट्रात सरकार आणलं, स्थिर ठेवलं. आता मध्यप्रदेशात काँग्रेसच्या मदतीला जाणार का असा प्रश्न विचारला असता, ‘या प्रश्नावर मला अशा प्रकारची एकाच राज्याची मर्यादित जबाबदारी देतील का,’ असा प्रतिप्रश्न पवार यांनीच विचारला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

