🕒 1 min read
Udayanraje Bhosale | सातारा : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती”, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं.
हे वाद ताजे असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. या विधानानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एका कार्यक्रमात विधान केलं. त्रिवेदींच्या विरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. यावर आता उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे की काय? जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती. असे वक्तव्य करताना या लोकांना लाज वाटत नाही का? हे लोक कशाचा आधार घेऊन बोलत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे.
ते म्हणाले, “राजकीय क्षेत्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंह अशा अनेक राष्ट्रपुरुषांचे स्फूर्तीस्थान शिवाजी महाराज होते. सामाजिक क्षेत्रात क्रांती करणारे शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांमुळेच प्रेरणा मिळालेली आहे”.
“असे असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले, असे विधान केले आहे. त्यांनी हे विधान कशाच्या आधारवर केले आहे,” असा सवाल करत उदयनराजेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो…”, संजय राऊतांचा सज्जड दम
- Balika Vadhu | बालिका वधूमधील ‘या’ अभिनेत्रीने केली प्रेग्नेंसीची घोषणा
- Ajit Pawar | फडणवीसांना आव्हान देणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले,
- Bisleri | बिसलेरीच्या बॉटलवर असेल आता ‘TATA’ चे नाव, 7 कोटीमध्ये घेतला ब्रँड विकत
- Basavaraj Bommai । “तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

