🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील आमच्या लोकांना राष्ट्रीय पातळीवरील काही गोष्टी माहितं नसतात, त्यांनी व्यक्त केलेली मतं ही राष्ट्रीय पातळीवरील धोरण नसतात, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे कलम 370 बाबतचे वक्तव्य खोडून काढले आहे. कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराबाबत राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते बोलत होते.
मोदी सरकारने आपल्या दुसरा कार्यकाळात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा म्हणजे कलम 370 हटवले आहे. या मोदी सरकारच्या या निर्णयाचे अनेक नेत्यांनी समर्थन केले आहे. त्याप्रमाणे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील समर्थनात वक्तव्य केले होते. यावरून शरद पवार यांनी आज भाष्य केले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काही मुद्यांवर दुमत होताना दिसत आहे. याआधी देखील अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत शरद पवारांच्या परस्परविरोधी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी काका -पुतण्याच्या वक्तव्याची चांगलीचं चर्चा झाली होती. मात्र आता हीच चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. एकीकडे शरद पवार कलम 370बाबतचा निर्णय सरकारने सगळ्यांना विश्वासात घेऊन घेयला पाहिजे होता, असे म्हणाले होते. तर कलम 370 रद्द झाले हे चांगले झाले, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

