Share

ठरलं तर मग ! सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवारांनी केले सूचक विधान

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंगेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान राज्याच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पवार म्हणाले की, सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा देण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आज भेट घेऊन आम्ही आढावा दिला. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर ही चर्चा झाली आहे. तसेच पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. मुंबईमधील नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे, असे सूचक विधान पवार यांनी केले.

संजय राऊत यांनी जुळवलेल्या 175 आकडेवारी बाबतही शरद पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही भाजप-शिवसेनाविरोधात निवडणूक लढवली आहे. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. संजय राऊत यांनी 175 जागांचं गणित कसं केलं हे माहिती नाही, आम्हाला कुणीही प्रस्ताव दिलेला नाही किंवा काही विचारलेलं नाही. आज महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठीचं संख्याबळ आमच्याकडे नाही. पुढे काय होतं ते पाहावं लागेल, असे पवार म्हणाले.

दरम्यान सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यात भाजप – शिवसेनेमध्ये सत्तेच्या समान वाटपावरून मतभेद झाल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तर शिवसेनेने कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापनेची अप्रत्यक्षरित्या तयारी दाखवली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या पर्यायाबाबत पवार आणि गांधी हे दोन प्रमुख नेते काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191351480931905536?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191351330784235520?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191348307383083017?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!