पंढरपूर : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशा शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शरद पवारांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करायचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी गंभीर गुन्हा केला आहे, कायद्यापेक्षा स्वतःला त्यांनी मोठं समजू नये- भाजप
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांचा असतो. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करू नये. असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत मांडलं आहे. सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करू नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटूंबास महापूजेचा मान द्यावा. असं ते म्हणाले आहे.
त्याचप्रमाणे, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचं देखील ते यावेळेस म्हणाले.
…तर हक्काची काम हातातून जातील, रोहित पवारांचे मराठी तरुणांना आवाहन
दरम्यान, नुकताच बारामती येथे भाजप कार्यालयात विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार हल्लबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारची नियत खोटी व हे सरकार प्रचंड जातीयवादी आहे. याचं बारामती मध्ये लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उद्यान आहे , परंतु आताच्या सरकारने विश्वासघात करून सत्ता मिळवली तर बारामती येथील उद्यानात जाणीवपूर्वक पाण्याची टाकी बांधून, त्यांची नियत आणि नीती धनगर समाजाबद्दल कशी साफ नाही हे दाखवून दिले. असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

