🕒 1 min read
मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
तासाभरात मिळतोय प्रवासासाठी ई-पास, नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.
पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं मूर्खपणाचं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपटून मार खाल्ला. धर्मांध शक्तींना विरोध करणारे शरद पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री किंवा ‘यांना’ पवारांचा अडसर वाटणे स्वाभाविक आहे. आधी, तुमच्या भाजपने बहुजनांवर काय अत्याचार केले, ते बघावे. मूर्ख माणसं बडबडत असतात. आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी दिली.
मोदींवर घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादी-काँग्रेसवाले बोलले आहेत, यापुढे जशास तसे उत्तर देऊ – राणे
दुसरीकडे भाजपने पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत, या प्रकरणातून हात झटकले आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार हे आपले राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत अस आपण पडळकर यांना समजावून सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
