पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
धक्कादायक : कोरोनामुळे झाला ‘या’ लोकप्रिय आमदाराचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.
पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत, या प्रकरणातून हात झटकले आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार हे आपले राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत अस आपण पडळकर यांना समजावून सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत.. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किव्हा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा… जशास तसे उत्तर देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 24, 2020
कामचुकार अधिकाऱ्यांची गय करणार नाही, लोणीकरांनी प्रशासनाला धरलं धारेवर
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत.. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा… जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशारा राणे यांनी विरोधकांना दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

