पुणे : या वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र केसारी स्पर्धेवर सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि अभिजित कटके या दोघांकडे सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात लक्ष्य आहे. मागील वर्षी अभिजित कटकेला बाला रफिक ने हरवले होते. अभिजित कटके हा ज्या चुकामुळे पराभूत झाला होता त्या सगळ्या चुका मागील एका वर्षात अभिजित कटके याने सुधारल्या असून तो नव्याने हे आव्हान पेलण्यासाठी तयार असल्याचे त्याने ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
अभिजित कटके यांच्या वडिलांचे स्वप्न होते कि अभिजित हा महाराष्ट्र केसरी व्हावा असेही त्याने सांगितले त्याच प्रमाणे यावर्षी तयारी करताना त्याचे कोच भरत म्हस्के, निंबाळकर सर, हनुमंत गायकवाड, यांनी त्याच्याकडे जातीने लक्ष दिले असे त्याने सांगितले. डबल ‘महाराष्ट्र केसरी’ तर होणारचं पण ओलम्पिक पदक देखील जिंकणार असा विश्वास त्याने बोलून दाखविला.
राजकारणातील ८० वर्षाचा पैलवान म्हणजे शरद पवार यांना भेटला. तेव्हा त्यांनी अभिजीतला बक्षीस म्हणून चेक दिला. इथेच थांबयाचे नाही असा मोलाचा सलाही दिला. शरद पवार आणि अजित पवार हे दोघे त्याचे मार्गदर्शक आहेत.
अभिजितच्या वडिलांना विचारले असता यंदाच्या वर्षी अभिजित हा महाराष्ट्र केसरी व्हावा अशी अपेक्षा असल्याचे म्हणाले तसेच त्यांच्या पाच पिढ्या या खेळाशी संबंधित असल्याचे सांगितले.अभिजितला त्याच्या कुटुंबाचा आणि मित्र मंडळीचे मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आहे.पराभवाने न खचता अभिजित पुन्हा एकदा तयारीनिशी रिंगणात उतरणार आहे. या वर्षी अभिजित कटके आणि बाला रफिक या दोघामधून कोण मानाची गदा उंचावणार की या दोघाव्यतिरीक्त तिसराच कोणी गदेचा मानकरी होणार आहे याकडे कुस्ती चाहत्याचे लक्ष्य लागले आहे.


