Share

खासदार उदयनराजेंचे पंख कापण्याचे शरद पवारांचे संकेत

Published On: 

सातारा: आजपर्यंत खासदार उदयन राजे आणि अजित पवार यांच्या फारकतीची वेळ आली तरी शरद पवार कदीच मध्ये पडले नाहीत. उदयनराजेंवरुन निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना पवारांनी आतापर्यंत शांतपणे उत्तरं दिले आहे. मात्र आज पहिल्यांदाच त्यांनी उदयनराजेंच्या स्टाईलवरुन चांगलेच टोले मारले. तसेच उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आयोजित कार्यक्रमाकडे पाठ फिरवली मात्र शरद पवार आवर्जून उपस्थित राहिले. आज पवारांनी उदयन राजेंचे पंख कापण्याचे शरद पवारांचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांना टोला मारला. ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत पवारांनी राजे स्टाईलवर शाब्दिक फटकारे मारले.
साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पेटले आहे. खासदार उदयन राजे समर्थक आणि विरोधक यांच्या नेहमीच शाब्दिक युद्ध होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा शाब्दिक चकमक होत असते.

याचं मुद्द्यावरुन पत्रकारांनी शरद पवारांना जिल्ह्यात पक्षांतर्गत निर्माण झालेल्या पेचाबाबत प्रश्न विचारला असता. पवारसाहेब म्हणाले, “काही पेचबीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं. उतारा काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी असते ती कॉलर अशी होते” अशी शाब्दिक टिपणी करत पवारांनी उदयनराजेंप्रमाणे उभी असणारी कॉलर पवारांनी खाली करुन दाखवली.

शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. दरम्यान ते पत्रकार परिषदेत होते. शरद पवार यांनी पहिल्यांदाच उदयनराजेंच्या स्टाईलवरुन मिश्किलपणे भाष्य केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!