Share

माझी पण इच्छा आहे… माझ्या नावावर कोणी अशी बिल्डिंग करावी, पवारांनी उडवली कंगनाची खिल्ली

Published On: 

मुंबई : अभेनेत्री कंगना रनौतची मुंबईत दाखल झाल्यावरही शिवसेनेनेवर टीकेची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. काल मुंबईत दाखल झाल्यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती आता कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना रनौतनं आता शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे. यासंदर्भात तिनं पत्राचं ट्वीट केलं असून शरद पवारांचा संबंध कंगनाने या जागा खरेदी व्यवहारात जोडला आहे.

कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. माझी पण इच्छा आहे… माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का..? हा प्रश्न आहे.’, असे पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या पत्राचं ट्विट करत कंगनानं म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने मला कुठेही नोटीस पाठवली नव्हती. माझ्याकडे सगळी कागदपत्रे होती, जी बीएमसीकडून मला नुतनीकरणासाठी देण्यात आली होती. कमीतकमी बीएमसीनं धेर्याने उभं राहिले पाहिजे आता खोटं का बोलत आहात? असा सवाल करत तिने ते पत्र पोस्ट केले होते.

वास्तव म्हणजे बीएमसीने कंगनाच्या खार येथे फ्लॅट आहे त्याठिकाणी नोटीस पाठवली होती. ज्या बंगल्यावर बीएमसीने बुधवारी कारवाई केली त्या पाली हिल येथील मालमत्तेला कोणत्याही प्रकारे बीएमसीने नोटीस दिली नव्हती. यावरही जी नोटीस बीएमसीने पाठवली ती फक्त माझ्यासाठी नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

सावंत तुझी लायकी गल्लीत बोलण्याइतकी नाही तू महाराष्ट्रच्या बाता करू नको – निलेश राणे

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली, पहा विनोद पाटील काय म्हणाले!

करणी सेनेकडून संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!