मुंबई : इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा इशारा आहे. गोध्रा हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली नाही, दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाली, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते आज देशाच्या पंतप्रधानपदी आहेत त्यामुळे संविधान धोक्यात आहे. हे वेगळे सांगायला नको, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यांचे मार्गदर्शक गोळवलकर गुरुजी यांनी 'बंच ऑफ थॉट' या पुस्तकात घटनेच्या विरोधात विचार मांडले आहेत. या गोळवलकर गुरुजींचे विचार मोंदीसकट सर्व मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारतात व त्याच मार्गाने जातात. यावरून त्यांची घटनेच्या संबंधीची मानसिकता स्पष्ट होते. pic.twitter.com/aVixnaTaT0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 20, 2018
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यप्रणालीवरही जोरदार टीका केली. गोळवलकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत ‘बेंचेस आॅफ थॉट’ या पुस्तकातून टीका केली होती. अशांच्या विचारांवर चालणारा भाजपा आहे. ते संविधानाविषयी करत असलेली वक्तव्ये धादांत असत्य आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

