Share

लखीमपूर घटनेची शरद पवारांकडून जालियानवाला हत्याकांडाशी तुलना, म्हणाले..

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘लखीमपूरमध्ये ज्यापद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला केला गेला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. फक्त निषेध केल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांना शांती मिळणार नाही. घटलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजपा, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारची आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वाखाली सखोल चौकशी करावी, आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा झाली पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, ‘ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, देशातील शेतकरी या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील, असे पवार म्हणाले. पीडितांच्या नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या विरोधकांनाही सरकार अडवत आहे. या सरकारकडून लोकशाहीची हत्या सुरू आहे. पण आम्ही विरोधक शेतकऱ्यांचा सोबत आहोत’, असेही पवार म्हणाले.

देशातील शेतकरी काही मुद्यांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारविरोधात शांततेत आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. दिल्लींच्या सीमांवर शेतकऱ्यांचा एक गट आंदोलन करत आहे. हे आंदोलन शांततापूर्णपणे आंदोलन करण्यात येत आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर यंत्रणेनं तो दडपण्याचा प्रयत्न केला, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!