Share

मी ‘त्यांचा’ गुरू आहे असे म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका – शरद पवार

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना गुरु म्हणतात यावर आपल परखड मत व्यक्त केलं आहे. आपण मोदींचे गुरू आहात असे ते म्हणतात. अशा वेळी आपण आपल्या शिष्याला हे सांगायला हवं की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतील असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले, ‘मी त्यांचा गुरू आहे असे म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. गुरू वगैरे सोडा, राजकारणात कुणी कुणाचा गुरू वगैरे असत नाही. आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही’. अस शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

तर पवारांनी देशातील अर्थव्यवस्थेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, दुर्दैवाने काय झालं मला माहिती नाही. ते सोडून गेले, आता जी माणसं आहेत ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे ती सावरण्यासाठी आणखी एका डॉ. मनमोहन सिंग यांची गरज आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केले.

देशाला आणखी एका मनमोहन सिंगांची गरज – शरद पवार

शेतीच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला पाहिजे, खासकरुन शेती आणि त्यांचे उत्पादन, शेतीशी संबंधित बाकीचे व्यवहार चालू आहेत. चालू नाहीत असं नाही, पण त्याला मार्केट नाही. मार्केट नसल्यामुळे सुरुवाताचे काही दिवस शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाचं पुढे जाऊन करायचं काय? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आला आहे. त्यानंतर मालाच्या किंमतीचे प्रश्न आले. त्यामुळे शेती, अर्थव्यवस्था संकटात आली. दुधासारखे जे शेतीचे जोडधंदे आहेत. त्याचा सप्लाय बंद झाल्यासारखी स्थिती होती. साधने नव्हती. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. अस देखील शरद पवार म्हणाले.

केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे, केंद्राकडे नोटा छापायचा अधिकार आहे. केंद्राकडे जागतिक बँका आणि एशियन बँकेकडून पैसे उभे करण्याची ताकद आहे. तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र बरेच काही करु शकतं जे राज्यांना शक्य नाही. राज्यांना उद्या कर्जरुपाने पैसा उभा करायचा असेल तर त्यांना स्वत:च्या निर्णयाने काही करता येत नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याने किती कर्ज काढायचं याची सीमा ठरवून दिलेली असते आणि त्यामुळे राज्यांना मर्यादा आहेत. या संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज काढून आपण राज्य स्थिरस्थावर केली तर आपण एक चौकट करु आणि घेतलेले कर्जही परत करु शकतो असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

पुण्यात लॉकडाऊन का ? अजित पवारांचा मोठा खुलासा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!