Share

पुण्यात लॉकडाऊन का ? अजित पवारांचा मोठा खुलासा

Published On: 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे या व्हायरसशी साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला. पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,’ असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.

अमिताभ नंतर मुलगा अभिषेक बच्चन याला देखील कोरोनाची लागण

दरम्यान आता या मुद्द्यावरून राजकारण सुरु झालं आहे. पुणे व्यापारी संघानंतर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावर आता अजित पवारांनी खुलासा केला आहे. पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भात आपण घेतलेला निर्णय हा एकतर्फी नसून तर व्यापक लोकहित व प्रशासनाकडून आलेल्या माहिती व सूचनांचा विचार करुनच हा निर्णय घेतलेला आहे. अस अजित पवार म्हणाले आहेत. लॉकडाऊनचा निर्णय घेताना पुणे शहराची सध्याची परिस्थिती, कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढणारी संख्या, नागरीकांचे स्वयंशिस्तीचे पालन न करणे, तसेच प्रशासनाकडूनही ज्या सूचना आल्या होत्या, त्याचा व्यापक विचार केलेला आहे. हा निर्णय कोरोनावर मात करण्याच्या उद्देशानेच घेतला आहे. त्यामुळे त्यात एकतर्फी असायचे काही कारण नाही, अस देखील अजित पवार म्हणाले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी दोन दिवसांपूर्वी कवितेतून सांगितल होतं, ‘वक्त ही तो है… गुजर जायेगा’!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!