🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मतभेद आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची चर्चा आहे. तसेच शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचीही चर्चा आहे. याविषयी कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सूचक विधान केले आहे.
यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. शेतकरी ढसाढसा रडत आहेत. अशावेळी शिवसेना आणि भाजप यांना बहुमत मिळूनही सत्तास्थापन होऊ शकलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी शरद पवार हे एकमेव व्यक्ती आहेत, जे महाराष्ट्राचे संरक्षण करू शकतात. तेच राज्याला या संकटातून बाहेर काढू शकतात असं विधान केले आहे.
यशोमती ठाकूर यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हालचाली सुरु आहे. त्यामुळे आघाडी आणि शिवसेनेचे नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन करणार असल्याचे चर्चा होती. यात शरद पवार यांना मुख्यमंत्री तर शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. त्यातचं यशोमती ठाकूर यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191966552884727809?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191961846586195968?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191959558593359872?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
