Share

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी सरकारशी चर्चा करून अनुकूल निर्णय घेऊ, पवारांचे आठवलेंना आश्वासन

Published On: 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे यावर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात मतैक्य झाले. आज सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या विषयावर भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी शरद पावर यांनी मराठा अरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या साठी रिपब्लिकन पक्षाने नेहमी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट रद्द करण्यास सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत आपणही केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा याबाबत रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की राज्य सरकार कायदेशीर बाबी तपासून मंत्रीमंडळाशी चर्चा करून याबाबत लवकर अनुकूल निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील. शरद पवार यांच्याशी झलेल्या भेटीत रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!