🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळी चांगलेच सक्रीय होताना पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सुरु असणारी पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार बीडच्या दौऱ्यावर आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर यावेळी शरद पवार यांनी बीडच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने चालणारा आहे. यात एका बाजूला संपत्तीचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा दर्यासागर आहे, असे शरद पवार म्हणाले.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, या अथांग सागरात संपत्तीचा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद तुमच्यात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवला.
दरम्यान, यावेळी पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेते मंडळींना म्हणाले, पक्षात असताना तुम्ही १५ वर्षे आमदार झालात, तुम्हाला राज्यमंत्रीपद दिले, मग या १५ वर्षांत तुम्ही नेमकं काय केलं, असा सवाल उपस्थित करत गयारामांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं.
-
शरद पवारांनी बीडमध्ये जाहीर केली राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी
-
पाकिस्तानी क्रिकेटपटू आता बिर्याणी खायला तरसणार

