खामगाव – रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी मागणी करूनही नगरपालिकेकडून होणाऱ्या दुर्लक्षला कंटाळून खामगाव मध्ये एमआयएम पार्टीच्या शहराध्यक्षांनी आज चक्क चिखलात लोटांगण घालून नगरपालिकेचे लक्ष वेधून घेत आंदोलन केले. खामगाव मध्ये आज अनोख्या पद्धतीने झालेल्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.
खामगाव नगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बर्डे प्लॉट परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असून या भागांमध्ये चालण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते, या भागातील रस्त्यावर मुरूम टाकून रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष आरिफ पहेलवान यांनी नगरपालिकेकडे केली होती, मात्र या मागणीकडे पालिकेने दुर्लक्ष केले होते.
वारंवार मागणी करून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने आज बर्डे प्लॉट मधील रस्त्यांवर असलेल्या चिखलामध्ये चक्क लोटांगण घालून शहराध्यक्ष आरिफ पहेलवान यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न केले… तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर त्याभागातील चिखल पालिके मध्ये आणून टाकू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी! ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना ‘दे धक्का!’
- आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार!
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

