Share

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण, चाहत्यांना केलं प्रार्थना करण्याचं आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- जगात कोरोनाच्या रुग्णांची 77 लाखांहून अधिक झाली आहे. तर यामुळे मृतांची संख्या आता चार लाख 27 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 1 लाख 40 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 77 लाख 25 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 39 लाख 19 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

या विषाणूच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी, खेळाडू देखील अडकले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. आफ्रिदीने स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. ‘मला गुरुवारपासून बरं वाटत नाही आहे. मी कोरोनाची चाचणी केली आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. लवकर बरा होण्यासाठी प्रार्थनांची गरज आहे’, असं ट्विट करत आफ्रिदी म्हणाला.

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आफ्रिदी अनेक गरजूंना सातत्यानं मदत करत आहे. त्यानं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. या कालावधीत तो अनेक लोकांना भेटला आणि त्यामुळेच त्याला कोरोना झाल्याची चर्चा सुरू आहे.

‘गुगल मॅप’वर आता अमिताभ सांगणार रस्ता

अनेक दिवसांनंतर दोन ‘जुने मित्र’ पुन्हा भेटणार…

औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!