Shahjibapu Patil । मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांचा शिंदे यांना पाठिंबा आहे. मात्र यानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी टीका केली आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले कि, आदित्य ठाकरे यांच्यावर काही संस्कार केले आहेत की नाही? की लहानपणी ते गल्लीबोळात फिरत होते. आमची गद्दारी नाही तर आम्ही खुद्दारी आहे. उद्धव ठाकरे काही बोलले तर त्यांचे शब्द आमदारांच्या जिव्हारी लागणार नाही. पण आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणं चुकीचं आहे. तसेच आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहे, तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?, असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
तसेच पुढे ते म्हणाले कि, इथं प्रत्येक आमदारांचे वय कोणाच ५०, कोणाचं ६०, कोणी ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण आपल्या घरात वडीलधाऱ्यांना आदराने, सन्मानाने बोलतो. हा संस्कार आपल्याला आईने लहाणपणीच दिलेला असतो. पण या पोराला काय शिकवलंय की नाही हे समजत नाही. हे पोरगं बाहेर गल्लीत हिंडत होतं, हेही समजत नाही,” अशा शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | “जनता मुख्यमंत्र्यांना समर्थन देते त्यामुळे…” ; उदय सामंत यांची प्रतिक्रिया!
- Subodh Bhave | “नालायक राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम”; सुबोध भावेचा घणाघात
- Subodh Bhave | “लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”; सुबोध भावे याची टीका
- महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार – सुप्रिया सुळे
- Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या १०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

