Share

राष्ट्रवादीचा सेवाधर्म; परळीत धनंजय मुंडेंची कोरोना रुग्णांना भेट

Published On: 

बीड: राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यात बीड जिल्हा गेला आहे असे चित्र सध्या तयार झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता येथील वातावरण चिंताग्रस्त झाले आहे. जिल्ह्यातील परळी येथे देखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना दिलासा व आधार देण्यासाठी सेवाधर्म हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सेवाधर्म अंतर्गत पंचायत समिती शासकीय निवासस्थान येथे उभारण्यात आलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र १०० बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला असून, परळीतील डॉ. गुरुप्रसाद देशपांडे व डॉ. आनंद टिम्बे व इतर काही डॉक्टर्स देखील येथे सेवा देणार असल्याची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते परळी येथे कोविड केअर सेंटर मधील रुग्णांच्या भेटीसाठी मंगळवारी गेले होते.

परळीतील विविध रुग्णालयात काम करत असलेल्या 500 कोरोना योध्यांना मोफत टिफीन डबे देण्यात येत असून, याची प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली आहे. शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी सेवाधर्म मार्फत एक ट्रॅक्टर फवारा उपलब्ध करून देण्यात आला असून, या ट्रॅक्टरद्वारे आजपासून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.

सेवाधर्म अंतर्गत प्रत्येक खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत जेवण देण्यात येते; जेवण, रेमडीसीविर इंजेक्शन अन्य औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात दोन स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. यांपैकी २५ स्वयंसेवकांना आज कोरोना कवच किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. पल्स ऑक्सिमिटर, जलनेती पात्र, मास्क, सॅनिटायझर, साबण आदी बाबींचा त्यात समावेश आहे. परळीतील सर्व कोरोना योध्यांना हे किट देण्यात येणार आहे.

शहर व ग्रामीण भागात लसीकरणासंदर्भात व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे, त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. परळीत लसीकरण केंद्रांवर ये-जा करण्यासाठी बससेवा सुरू केली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, तसेच कोरोनाबाबतचे नियम पाळून वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंडेंनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!