Share

कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा, पीक विमा योजनेसाठी ‘बीड पॅटर्न’ राबवणार

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : साठेबाजी आणि लिंकिंगच्या मुद्द्यावरून युरियासाठी दरवर्षी शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. ती टाळण्यासाठी या वर्षी दीड लाख टन युरियाचा बफर स्टॉक केला जाणार आहे. त्याच वेळी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना फटका बसला असून कंपन्या मालामाल झाल्यात. त्यामुळे यंदापासून ‘बीड पॅटर्न’ वापरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली.

कृषीमंत्र्यांनी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांचा खरीपपूर्व आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, युरियावर मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते म्हणून खत विक्रेते या खतासोबत इतर खतांचे लिंकिंग करतात. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची अडवणूक होते. हे टाळण्यासाठीच या वर्षी दीड लाख टन युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचा फायदा निश्चितच दिसून येईल.

तसेच पीक विमा योजनेसाठी बीड पॅटर्न राबवण्याची घोषणा दादा भुसे यांनी केली आहे. एखाद्या जिल्ह्यात प्रीमियमपोटी १०० कोटी रुपये गोळा झाले असतील आणि नुकसानीपोटी केवळ ५० कोटी रुपयेच वितरित करावे लागणार असतील, तर उर्वरित ५० कोटी रुपयांत १० कोटी रुपये कंपनीला त्यांच्या यंत्रणेचा खर्च म्हणून आणि १० कोटी रुपये त्या कंपनीचा नफा, असे २० कोटी रुपयेच दिले जातील. उरलेले ३० कोटी रुपये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दिले जावेत, असा बीड पॅटर्न असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!