🕒 1 min read
नवी दिल्ली : दहा वर्षांपूर्वी सेक्सटेप प्रकरणामध्ये अडकलेला स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद याने देशातून पलायन करून एका बेटावर नवा देश वसवल्याची चर्चा होती. आता या बेटाच्या नावाने एक इ-मेल तयार करण्यात आला असून या इ-मेलच्या माध्यमातून त्या बेटावरील व्हिसा मिळवता येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नित्यानंदने गेल्या वर्षी त्याने एक बेट विकत घेत त्याने त्या बेटाला ‘कैलासा’ असे नाव दिले. या बेटाला हिंदुंचा देश घोषित करत त्याने काही महिन्यांपूर्वी या बेटावर ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा’ स्थापन करण्याची घोषणा केली होती.
Kailasa trip is open now. You can apply for visa. And have a Darshan of Lord Shiva physically. ???? pic.twitter.com/ywGH2qpypi
— Vishweshwar Bhat (@VishweshwarBhat) December 17, 2020
सोशल मीडियावर नित्यानंदचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात त्याने असा दावा केला आहे की त्याच्या कैलासा या देशात येण्यासाठी त्याची स्वतःची चार्टर्ड विमानसेवा आहे ज्यातून लोक इथे येऊ-जाऊ शकतील. मात्र बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना इथे फक्त तीनच दिवस राहण्याची परवानगी असेल.
हे विमान ऑस्ट्रेलियावरून पकडता येणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. सोबतच असाही दावा केला आहे की या व्हिसासर कैलासाच्या यात्रेत परमशंकराचे दर्शनही घडवले जाईल.
कैलासाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार हे सीमा नसलेले राष्ट्र आहे, जगभरातील हिंदूंनी निर्मित, ज्यांनी स्वतःच्या देशात हिंदूत्वाचा प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा अधिकार गमावला आहे. स्वतंत्र कायदे, स्वतंत्र राज्यघटना आणि शासकीय रचना याबाबतही माहिती दिली आहे. ‘महानतम हिंदू राष्ट्र’ कैलासाचे नागरिकत्व मिळण्यासाठी देणगी देण्याची मागणीही या संकेतस्थळावरून केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगासनाला स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून औपचारिक मान्यता
- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आघाडीवर
- बीड जिल्ह्यातील दोनशे शाळा कात टाकणार; मराठवाड्यासाठी २०० कोटी
- तृणमूल काँग्रेसला खिंडार; दिग्गज नेते सोडू लागले ममता बॅनर्जी यांची साथ
- पंतप्रधान मोदींनी पाठवलं पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना पत्र !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

