Share

कलम 370 काढलतं खर पण पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला होईल : इम्रान खान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची चांगलीचं पाचावर धारण बसली आहे. भारताच्या जम्मू काश्मीरबाबतच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इम्रान खान यांनी भारताला पुन्हा एकदा धमकी वजा इशारा दिला आहे. भारतात पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला होईल, अशी धमकी खान यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट सुरु आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता असा दावा सुद्धा इम्रान यांनी यावेळी केला. हे प्रकरण आपण संयुक्त राष्ट्राकडे घेऊन जाऊ असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

तसेच इमरान खान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्ध करण्याची भाषा केली आहे. मंत्री फवाद चौधरी यांनी, ‘संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार रहायला हवे’ असं विधान केले.

दरम्यान जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केल्याप्रकरणी पाकिस्तान सरकारनं भारताला जशीच्या तशी तीव्र प्रतिक्रिया द्यायला हवी, असं विधान विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी केले आहे. यावर उत्तर देताना इमरान खान यांनी ‘विरोधी पक्षनेत्यांना नेमकं काय हवंय? मी पाकिस्तानी सैनिकांना भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यायला हवा? अस उत्तर दिले.

#Article370 : शरद पवारांना आला मुफ्ती आणि अब्दुल्लांचा पुळका

#Article370 : ‘या’ कारणामुळे शरद पवार होते सभागृहात गैरहजर

कलम 370 हटविण्यास लोकसभेची मंजुरी, 351 विरुद्ध 72 मतांनी प्रस्तावावर शिक्कामोर्तब

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!