Share

गुप्त पथकांचे एसटी स्थानकांवर लक्ष; ‘या’ गोष्टींची करणार तपासणी!

Published On: 

औरंगाबाद : प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण राज्यभर अनुदानित, अंशतः अनुदानित तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. हे पथक फक्त तिकीटच नाही तर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवरही नजर ठेवत आहे. अशाच एका तपासणीत सिडको बसस्थानकावर कर्तव्यावर असलेल्या चालक वाहक विना गणवेश होते. या पथकाने त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये अशी जागरूकता निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळाने बुधवार (दि. २२) ते बुधवार (दि. ६) या कालावधीत तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेर्तगत बसचा मार्ग फलक, बसच्या वाहकाचा हिशोब तपासणी, बसची स्वच्छतेसह प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी केली जात आहे. एसटी महामंडळात कर्तव्यावर असणार्‍या कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाने दिलेला गणवेश घालूनच कर्तव्य पार पाडावे, असा नियम आहे.

मात्र काही जण गणवेश न घालता कर्तव्यावर असतात, अशा कर्मचार्‍यांविरूध्द कारवाई केली जाते. बुधवारी सिडको बसस्थानकात तिकिट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी तीन एसटी कर्मचार्‍यांचे पथक तैनात केले आहे. यात एसटी महांमडळातील दोन चालक व एक वाहक हे कर्मचारी कर्तव्यावर असतांना विनागणवेश आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या कर्मचार्‍यांवर एसटी महामंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. एसटी बसेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. तसेच आपली तिकीटे काळजीपूर्वक जपुन ठेवावीत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!