चंद्रपूर- कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांना टाळे लागले आहे. राज्यातही हीच परिस्थिती आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार ऑगस्टपासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी काही नियमावली आणि निकष ठरविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनात राज्यात सर्वप्रथम शैक्षणिक संस्था सुरू होण्याचा मान यानिमित्ताने या जिल्ह्यांना मिळणार आहे.गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात गरीब लोक राहतात. नक्षलग्रस्त भागातील बहुतांश नागरिक दारिद्रय रेषेखालीलच आहेत. येथील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकतात. पालक मुलांना मोबाईल घेवून देऊ शकत नाही. तेथे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही.त्यामुळे या शाळातील मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.
याउलट इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ऑनलाईन शिक्षणाची सोय आहे. येथे शिकणाऱ्या मुलांनाही सहज ही सुविधा उपलब्ध होवू शकते. त्यामुळे या शाळांमधील आनलाईन शिक्षणाला आमची हरकत नाही. मात्र जिल्हा परिषदेतील शाळांच्या विद्याथ्र्यांना या सुविधा मिळत नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ज्या गावात एका महिन्यांपूर्वी कोरोना रूग्ण आढळला नाही. तिथल्या शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नियमावली तयार केली जाईल. यात विद्यार्थ्यांना मास्क, शाळेचे निर्जंतुकीरण, शारिरीक अंतर आदी निकष ठरविले जाणार आहे. येत्या चार ऑगस्ट पासून या दोन्ही जिल्हातील शाळा सुरू केल्या जाईल. यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ते सुद्धा सकारात्मक असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता अभिनेता सोनू सूदचा पुढाकार!
कोणी चंपा, टरबुज्या म्हणलं तर खपवून घेऊ नका, पलटवार करा: चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

