औरंगाबाद : राज्य शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरु करण्यास अनुमती दिलेली आहे. त्यानुसार मनपा हद्दीतील आठवी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून (दि.४) कोरोना नियमांचे पालन करुन सुरु होत आहेत, असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मनपा व खाजगी प्रशासनाच्या आठवीपर्यंतच्या ३९३ शाळा आणि ८ ते १२ वी वर्ग असणाऱ्या ४१३ शाळा सुरू होणार आहे. यामध्ये एकूण ७८ हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत.
मनपा शाळेतील १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाचा धोका टळला आहे. ऑफलाइन शाळा सुरु झाल्यानंतर मुलांची उपस्थिती ऐच्छिक असेल. शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येण्याची जबरदस्ती करू नये. दरम्यान, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती हीच पालकांची संमती समजून त्याला वर्गात बसवावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात अशासकीय, खासगी, शासकीय, इंग्रजी माध्यमाच्या एकूण ८५० शाळा आहेत. या ठिकाणी आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या १ लाख ९ हजार ६३३ एवढी आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील आठवी ते १२ वीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासाठी ४८ तासांपूर्वी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, खासगी वाहन चालक, रिक्षाचालकांना दोन्ही डोस आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मध्यंतराची सुटी न देता वर्गातच अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलवावे. हि नियमावली आहे. ३५०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेमध्ये उपस्थित राहणार आहे. शाळेमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १०० % शिक्षकांचे लसीकरण आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- सुडभावनेने कितीही कारवाया झाल्या तरी मराठ्यांच्या हक्काचा लढा लढणारच; मराठा आंदोलकाचा ‘ठाकरे सरकार’ला इशारा!
- शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक
- शिवसेना, शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीर; फक्त हाक द्या, आ. दानवेंचे शेतकऱ्यांना आश्वासन!
- ‘राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपद द्यायला हवे!’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

