वाशीम : गरीब व गरजू रूग्णांच्या मदतीसाठी दिल्या जाणार्या मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीमध्ये लक्षणिय घट झाली आहे तर दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील केवळ 9118 रूग्णांना लाभ दिल्याची बाब माहिती अधिकारांतर्गत समोर आली आहे. गेल्या 6 महिन्यातील मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीचा घटता आलेख व महात्मा फुले योजनेंतर्गत उपचाराची आकडेमोड बघता ही योजना केवळ पांढराहत्ती ठरत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी केला आहे.
फडणवीस सरकारचे काळात रूग्णाचे नातेवाईक वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचे तर ऑफलाईन अर्ज मंत्रालयातील वैद्यकीय सहा. कक्षामार्फत स्विकारले जायचे. आता मात्र ऑनलाईन अर्जासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास कोविडसाठी निधी मागितला जातोय, त्यामुळे सहाय्यता मागण्यासाठी गेलेल्या रूग्णाला राज्य सरकार देणगी मागतं की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळेल या अपेक्षेपोटी कागदपत्रांची पुर्तता करून रूग्णांचे नातेवाईक आमदारांकडून शिफारस पत्र घेऊन जातात. मात्र, या अर्जांना उत्तरे दिली जात नाही, अर्ज कुठे करावा तो कसवा पाठवावा याची माहिती नाही, मंत्रालयात टपाल कुणाकडे द्यावा यासाठी रूग्णांना चार-चार दिवस ताटकळत बसावं लागत, वेळ, पैसा तर खर्च होतोच, जाब विचारायला जबाबदार अधिकारी नाहीत.
आर्थिक मदत करण्याऐवजी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्याविषयीचे पत्र दिले जाते. अन्यथा खासगी ट्रस्टकडे बोट दाखविले जाते हा प्रकार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी पुरता खेळ सुरू असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. फडणवीस सरकारचे काळात वर्षाकाठी सरासरी 18 हजारांच्यावर प्रकरणांना मंजुरी मिळायची. गेल्यावर्षी नोंव्हेंबरमध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात याचा लाभ घेणार्यांच्या संख्येत सतत घट होत आहे.
कोरोनाचे संकट असतांना देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाटपात दहापट घट झाली आहे. जानेवारीमध्ये 1691 अर्ज आले पैकी 501 अर्जांना मंजुरी मिळाली. मार्चपासून देशात कोरोनाच्या संकटामुळे अर्जाची संख्या घटली. एप्रिलमध्ये 63 अर्जापैकी 46 रूग्णालयातील 52 मंजूर झाले. मेमध्ये सर्वात कमी 49 अर्जांना मंजुरी मिळाली. तर ऑगष्टमध्ये यात थोडी वाढ होऊन 29 तारखेपर्यंत 93 लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहचली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
बाळासाहेबांचे चिरंजिव एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण करतील, असे वाटले नव्हते
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगणाला भोवणार, विक्रोळीत गुन्हा दाखल
गडचिरोलीतील पुराची अखेर केंद्राने घेतली दखल, अशी होणार पाहणी

